भगवंत देवस्थान ट्रस्ट मार्फत साजरे केले जाणारे वर्ष भरातील उत्सव..
वैशाख – श्री भगवंत प्रकट दिन
वैशाख शुद्ध षष्ठी ते वैशाख शुद्ध द्वादशी पर्यंत सात दिवस उत्सव साजरा केला जातो. मंदिरास आकर्षक रोषणाई केली जाते.देवस्थान ट्रस्ट व बार्शी नगरपालीकेच्या संयुक्त विद्यमाने सात दिवस “भगवंत महोत्सवाचे भगवंत मैदान येथे आयोजन केले जाते. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, संगीत रजनी ई.चे आयोजन केले जाते.
जेष्ठ – अमावस्या ते आषाढ पौर्णिमेपर्यंत श्री. पंढरपूरला पायी जाणार्या दिंड्या व वारकर्यांना भोजन व निवासाची व्यवस्था केली जाते. दिडशे वर्षांपासुन हि परंपरा सुरू आहे.
आषाढ – दशमी ते पौर्णिमा कीर्तनाचे आयोजन. आषाढी एकादशी दिवशी श्री. भगवंत उत्सव मुर्ती रथोत्सव साजरा करण्यात येतो.
श्रावण – श्रावणमास निमित्त गेली अठरा वर्षे ह.भ.प.अँड. श्री. जयवंतराव बोधले महाराज यांचे प्रवचन एक महिनाभर चालते.अंदाजे रोज तिन हजार भाविक या प्रवचनाचा लाभ घेतात.
कार्तिक – कार्तिक मास खास दिपावली निमित्त मंदिरास आकर्षक रोषणाई केली जाते. तसेच दशमी ते पौर्णिमा या दरम्यान कीर्तनाचे आयोजन करण्यात येते.
पौष – पौष मास मकरसंक्राती निमित्त महिलांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. ट्रस्ट मार्फत या दरम्यान योग्य नियोजन केले जाते.
माघ – श्री.रामदास नवमी निमित्त सात दिवस कीर्तनाचे आयोजन केले जाते.
फाल्गुन – श्री. तुकाराम बिज, श्री.एकनाथ महाराज नाथ षष्ठी उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो.